🕒 1 min read
बीड : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरपेक्षा काही नातेवाईकच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करत आहेत. पर्यायाने काळ्या बाजारातून जास्तीचे पैसे घेऊन हे इंजेक्शन घ्यावे लागते आहे. याबाबत सरकार मूग गिळून गप्प का आहे? अजून किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे? असा सवाल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ज्या कोरोनाबाधितांचा स्कोअर वीस येत आहे, त्या कोरोनाबाधिताला रेमडेसिविर इंजेक्शन जरी दिले नाही तरी तो व्यक्ती ठीक झाला आहे. अनेक ठिकाणी रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शन न घेता नीट झालेले आहेत. परंतु, काही ठिकाणी डॉक्टर काही बोलण्याअगोदरच रुग्णांचे नातेवाईक आता रेमडेसिविर किती इंजेक्शन लागतील असे विचारतात? त्यावर खासगी दवाखान्याचे डॉक्टर सांगतात की आमच्याकडे इंजेक्शन शिल्लक नाही, तुम्ही बाहेरून आणा.
सातशे-आठशे रुपयांचे इंजेक्शन कोणत्याच रुग्णालयात भेटत नाही, पण जास्तीचे पैसे मोजले की हे इंजेक्शन कसे काय मिळते? या काळाबाजाराचा शोध सरकारने घेणे गरजेचे आहे. तसेच हे सरकार अजून किती जणांचा बळी घेणार आहे, असा सवालही आमदार धस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
- ८० कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भामटा गजाआड
- संजय राठोडनंतर यवतमाळचे नवे पालकमंत्री भुमरे विस्कटलेली घडी कशी बसवणार?
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा


