Share

नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. ती थांबवण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करावी अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले की, दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या जिल्ह्यात रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची सोय नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणी जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आधुनिक उपचार, नवीन तपासणी यंत्रणेद्वारे अचूक निदान व इतर आजारांसंबंधी उपचार या सुविधा जिल्ह्यातच मिळण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय असते, तर कोरोना रुग्णांना स्थानिक ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांची हेळसांड थांबली असती. भविष्यातील धोके लक्षात घेऊन नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशाी मागणी अखिल भारतीय क्रांती सेनेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!