🕒 1 min read
मुंबई : मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यातच यंदा आयपीएलचं आयोजन झालं आहे. आयपीएलमधील काही खेळाडू देखील सध्या स्पर्धा सुरूअसूनही रोजा करत आहेत.
रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सुर्य उगवण्यापुर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपुर्ण दिवस सुर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा असतो. सुर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपास सोडायचा असतो. असा हा नियम संपुर्ण महिनाभर पाळायचा असतो.
https://www.instagram.com/p/CNkRbehhKxy/?utm_source=ig_web_copy_link
बंधुभावाचा हा सण शत्रुला देखील जवळ करा असा संदेश प्रवाहीत करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात.
https://www.instagram.com/p/CNz_sbshmP0/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद संघाचा दर्जाचा फिरकीपटू राशिद खान याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हैदराबादच्या संघातील मुस्लिम खेळाडूंना साथ देत संघातील काही स्टार खेळाडूंनीही रोजा ठेवला आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार केन विल्यमसन यांनी राशिद खानसोबत रोजा ठेवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राऊतांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावी, मी आता राऊतांवर एक पुस्तक लिहितो’
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘खबरदारी घ्या, अन्यथा परिस्थितीबाहेर जाईल’, आ.संजय राठोड यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

