Share

कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार

Published On: 

🕒 1 min read

जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी दिवसरात्र एक करून काम करत आहे. मात्र, हे काम करत असताना वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करत आहे. आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे मानधन कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला झाले पाहिजे. तरीही जिल्हास्तरीय अधिकारी याला जुमानत नाहीत. जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मानधन नेहमीच वेळेवर जमा करतात आणि यामध्ये मानधन जमा करणारे अधिकारी स्वत:चे मानधन सुद्धा जमा करून घेतात.

परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालय या अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वीस ते पंचवीस दिवस उशिराने जमा होत असते. काहीतरी थातूरमातूर कारण पुढे करून कोरोनामध्ये सी सी सी,डी सी एच सी,कोविडं हॉस्पिटल असो सगळ्या ठिकाणी मदार ही कंत्राटी कर्मचारी यांच्यावरच आहे. कोविडमध्ये जवळपास सत्तर टक्के हे कंत्राटी कर्मचारीच काम करत आहेत.

एवढे असून सुद्धा ह्या कर्मचाऱ्याची आर्थिक अडवणूक केली जाते आणि हे नेहमीच असे केले जाते. त्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. ज्या लोकांचे मानधन वेळेवर जमा होतात ते कर्मचारी एसीमध्ये बसून काम करतात आणि जे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णांना सेवा देतात . त्या कर्मचाऱ्यांना मानधनासाठी दर महिन्याला २० ते २५ दिवस वाट पाहावी लागते. कोरोना काळात सेवा देऊन सुद्धा अशी परिस्थिती असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!