Share

…तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेऊन चौकशी केली.

हे समजताच रात्री उशिरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावेळी त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक वादावादी देखील झाली होती. हे सर्व समोर येताच भाजप आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत.

या प्रकरणी आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. रेमडेसीवरच्या साठ्याची माहिती त्यांच्याकडे होती तर ती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना द्यायला हवी होती. त्यामुळे चर्चा केल्यानंतर जर ते रेमडेसिवीर आणू शकले असते तर त्यांनाही श्रेय घेता आलं असतं.’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!