Share

कृउबास सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक

Published On: 

अकोला : अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सहसचिव गोपाल कराळे यांना मारहाण केल्याची तक्रार काल पोलिसात दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अकोट शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.गावंडे यांच्या विरोधात ३५३, २९४, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाख़ल करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?
बाजार समिती कार्यालयात १७ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजता दरम्यान बाजार समिती सहसचिव विनोद रमेश कराळे हे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करीत होते. यावेळी संजय लक्ष्मणराव गावंडे हे आले त्यांनी तुम्ही ड्युटी करीत नाही,लोकांना त्रास देता असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली.

तसेच यापुढे लोकांची कामे वेळेवर नाही केली तर नौकरी करणे मुश्कील करुन देईल अशी धमकी दिली. या घटनेची माहीती बाजार समिती सभापती भारतीताई गावंडे व सचिव राजकुमार माळवे यांनी दिल्यानंतर सभापती व सचिव यांनी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार देण्यास सांगितले, अशी फिर्याद अकोट शहर पोलीस स्टेशनला सहसचिव विनोद कराळे यांनी दिली.

या तक्रारीवरुन अकोट शहर पोलिसांनी संजय गावंडे यांना अटक केली. यानंतर न्यायालयात हजर केले असता, गावंडे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत जामीन घेण्यास नकार दिला. यानंतर या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.

संजय गावंडे यांचे नेमके म्हणणे काय आहे ?

अकोट बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार,घोळ उघड झालेले असुन चौकशी सुरु आहेत.शेतकऱ्यांना योग्य वागणुक न देता कर्मचारी काम करीत नाही,या सर्व प्रकाराबद्दल बाजार समितीत विचारपुस करायला गेलो असता,सचिव माळवे नेहमी प्रमाणे गैरहजर असल्याने सहसचिव समोर आहे. त्यांनी योग्य उत्तरे दिली नाही,अरेरावी केली,मद्यधुंद अवस्थेत होते.त्यांचे सोबत केवळ बाचाबाची झाली. कोणतीही मारहाण केलीच नाही,शिवाय सरकारी कामात अडथळा आणला नाही तरी सुध्दा मद्यधुंद अवस्थेत पोलीसात सहसचिव गेले. त्यांची वैद्यकीय तपासणी न करतांच माझ्यावर एकतर्फी खोटा गुन्हा दाखल केलं असा आरोप संजय गावंडे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!