Share

‘आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.या सामन्यात विजय मिळवत आरसीबीने विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या आजच्या पहिल्या डबल-हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 38 धावांनी शानदार विजय मिळवला. आरसीबीच्या सलग तिसऱ्या विजयात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी मोलाचा वाटा उचलला. यावरच वॉन यांनी मोठी भविष्यवाणी केली.

माजी इंग्लिश कर्णधाराने म्हटले की, आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण नॉक आउट्समध्ये त्यांना पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सचा अडथळा दूर करावा लागणार आहे. ‘बर्‍याच वर्षांपासूनच हे सर्वोत्तम संतुलित आरसीबी आहे. हे त्यांचे वर्ष असू शकते!!! नॉकआउट्समध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला तरच!’ असं ट्विट वॉन यांनी आरसीबीच्या सलग तिसऱ्या आयपीएल विजयानंतर केले.

 

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!