Share

जालना जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्यांना पोलिसांचा दंडुका

Published On: 

जालना: कोरोनाचा वाढता कहर वाढत आहे. हा कहर आटोक्यात यावा यासाठी शासनाच्या वतीने वेळोवेळी वेगवेगळे निर्बंध लादले जात आहेत. याबाबत प्रशासनाने नव्याने नियमावली जाहीर केली असून, मंठा शहरात पोलिस प्रशासन आणि नगरपंचायतच्या वतीने ३० जणांवर संयुक्त कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान शहरात येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावली असून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलिस तपासणी आणि विचारणा करीत आहे. नगरपंचायतच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात असून आतापर्यंत त्यांच्याकडून सुमारे सहा हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून ही साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे.

मंठा नगरपंचायत आपल्या अधिकाराबाबत जागृत असली तरी त्यांना आपल्या कर्तव्याचा मात्र विसर पडत आहे. एकीकडे विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई होत असताना दुसरीकडे कोणत्याही प्रकारची नियमित फवारणी किंवा कचरा संकलन होताना दिसत नाही.अशा रोगराईच्या काळात घरी कचरा पडून राहणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. केवळ मुख्य रस्ता साफसफाई केला जातो. अंतर्गत रस्ते मात्र कधीही झाडले जात नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!