🕒 1 min read
नांदेड : कोराेना पॉझिटीव्ह पतीच्या निधनानंतर कसे जगायचे या विवंचनेत पत्नीने तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेत आत्मह्त्या केल्याचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार लोहा शहरात गुरुवारी घडला आहे. या मध्ये पद्मा कडम (३५) आणि तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
पतीचे कोराेनामुळे नुकतेच निधन झाले. यातच संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि चिमुकल्याला कसे जगवायचे या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्हामधील लोहा शहरामध्ये घडला आहे. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी दुर्दैवी ही कहाणी आहे. बुधवारी (दि. १४) पद्माचे पती हणमंतू कडम (39) यांचं कोरोनाने निधन झाले. त्यानंतर पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नी पद्मा कडम (35) या महिलेने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
लोहा शहरामधील बालाजी मंदिराच्या पाठीमागे तेलंगणमधील अम्मापुरम येथून उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब लोहा येथे आले होते. ते दररोज चटई विक्री तसेच मोलमजुरी करून कुंटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान लॉककडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध लागु केल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा हा मोठा प्रश्न कडम कुटुंबीयांपुढे आ वासुन उभा होता. दरम्यान या संघर्षातच हणमंतुला कोरोनाची लागण झाली. उपचारासाठी त्यांना लोहा कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तीन दिवसानंतर उपचारादरम्यान हनुमंतूचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात कुटुंबात सिद्धू (6) अलकिया (7 ) ही दोन मुले आहेत. चिन्नना दुर्गना कडम (39, रा. संतोषनगर, निजामाबाद, आंध्रप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


