🕒 1 min read
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. या संबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवले आहे. या पत्रावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केलीय. मुख्यमंत्र्यांनी सरळ फोन न करता पत्र पाठवले असल्यामुळे भातखळकर यांनी ही टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या आधी कडक लॉकडाऊनची घोषणा करतानाच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी लवकरच पंतप्रधानांना पत्र पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरही भाजप नेत्यांनी टीका करत हे आधीच करायला हवे होते, असा आरोप केला होता. आता मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. यावरही भाजप नेत्यांनी टीका केली आहे. या विषयी सोशल मीडियावर अतुल भातखळकर यांनी पोस्ट केलीय. यामध्ये ते म्हणाले की, ‘ज्यांच्यावर सतत खोटारडी टीका करतो त्यांना फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना (मागणी) पत्र पाठवले असावे.’
ज्यांच्यावर सतत खोटारडी टीका करतो त्यांना फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना (मागणी) पत्र पाठवले असावे. pic.twitter.com/2Pe81CxZGz
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 15, 2021
कोरोना ही जागतिक महामारी आधीच घोषित करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी याला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती घोषित झाल्यास, राज्याला या संकटाचा सामना करण्यासाठी अतिरीक्त निधी मिळेल. त्यामुळे राज्य सरकारला संकटाचा सामना करण्यासाठी अधिक मदत होणार आहे. मात्र, केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, ते पाहावे लागणार आहे.
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


