Share

सर्क्युलरच्या गोंधळामुळे पुण्यात गरिबांना शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागले पैसे !

Published On: 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना गरीब, गरजू व हातावर पोट असलेल्या घटकांसाठी मदतीची घोषणा देखील केली. तर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी देखील मोफत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.

१४ एप्रिल रोजी रात्री आठ नंतर कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पुण्यात मात्र आज वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. गर्दी पूर्ण बंद झाली नसून शिवभोजन थाळी आज मोफत मिळत नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला १० रुपये प्रति थाळी अशी सुरुवात झालेल्या शिवभोजन थाळीची किंमत टाळेबंदीमध्ये ५ रुपये करण्यात आली. आता ही थाळी मोफत देण्याची मुख्यमंत्र्यांनी केली मात्र गरजू, गरीब घटकांना आज ही थाळी पैसे देऊनच घ्यावी लागली आहे.

याला कारणीभूत आहे ते व्यवस्थेमधील गलथानपणा. घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, ती फायद्याची असल्याने अनेकांनी समाधान देखील व्यक्त केले. मात्र, लेखी परिपत्रक न आल्याचे सांगत शिवभोजन थाळी केंद्रांवर आज पैसे आकारण्यात आले आहेत. दरम्यान, दुपारनंतर जीआर प्राप्त झाला असून उद्या पासून शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!