🕒 1 min read
वैजापूर : शहरातील लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलमध्ये शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्या प्रकरणी डाॅ. गणेश अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच याच रस्त्यावरील त्यांच्या लहान बंधूंच्या आधार हाॅस्पिटलमध्ये १२ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसतांनाही रुग्णांना दवाखान्यात दाखल करुन घेणे सुरु आहे. शहरातील लाडगाव रस्त्यावरील डाॅ. ईश्वर अग्रवाल यांच्या आधार हाॅस्पिटलमध्ये १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील एका ६० वर्षीय रुग्णास उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रवाना करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर दवाखान्याचे संचालक डॉ. ईश्वर अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कामगारांनी अत्यंत गोपनीय व शिताफीने मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शहरातील कोणत्याही दवाखान्यास कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नसतानाही डॉ.अग्रवाल यांनी या रुग्णास दाखल करून कसे घेतले?
या हाॅस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी तर नाहीच. याशिवाय दवाखान्यात पीपीई किट, रुग्णांसाठी विलगीकरणाची व्यवस्था, उपचार करणारा स्वतंत्र कर्मचारी वर्ग, डाॅक्टर उपलब्ध असणे बंधनकारक आहे. परंतु डॉ. अग्रवाल यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून कोरोना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे सिद्ध झाले. एवढेच नव्हे मृत पावलेला रुग्ण हा कोरोना बाधितच होता. असेही ते सांगायला विसरले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्थिक चणचणीत मनपाला दिलासा! सीएसआर निधीतून कोरोनाला रोखण्यासाठी मिळाला ‘इतका’ निधी
- अमेरिकेतल्या ‘त्या’ घटनेला 8 दिवस पूर्ण, साडे तीन वर्षाच्या विहाचे भविष्य अधांतरी
- ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ ; व्हायरल गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
- पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा कोटा वाढवून द्या, भाजप आमदाराचे जावडेकरांना साकडे
- बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

