🕒 1 min read
नांदेड : मनसेचे विद्यमान जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (५२) यांचे हैद्राबाद येथे उपचार सुरु असताना गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूने सर्व पक्षीय राजकीय क्षेत्रांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना या वेळी अनेक राजकारण्यांनी व्यक्त केली.
प्रकाश कौडगे यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेनेपासून सुरु झाली. १९९० पासून शिवसेनेत ते होते. प्रकाश कौडगे यांनी १९९६ साली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली होती. सर्वाधिक काळ जिल्हा प्रमुख असल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. १९९७ साली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर त्यांच्याच कार्यकाळात शिवसेनेची सत्ता आली होती. याच बरोबर नांदेड जिल्हा परिषदेवर देखील भगवा फडकवण्यासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, कै. गोपीनाथ मुंढे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले होते.
ते भाजपमध्ये काही काळ कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. महिनाभरापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे देखील झाले होते. त्यानंतर त्यांची अन्य आजाराने प्रकृती बिघडली. हैद्राबादच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून, तीन भाऊ असा परिवार आहे. एक सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


