मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित करताना दिली होती.
राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्रात ऑक्सिजनचा गंभीर तुटवडा !
राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांना म्हणतात की, राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत असून रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या ११.९ लाखापर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे . मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये संपूर्ण देशात सक्रिय रुग्ण १०.५ लाख होते. राज्यात आजमितीस ५.६४ लाख सक्रिय रुग्ण आहेत अशा परिस्थितीत वैद्यकीय कारणासाठीच्या ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा चिंतेची बाब आहे.
आज राज्यात १२०० मेट्रिक टन उत्पादनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज आहे. एप्रिल अखेरीपर्यंत ऑक्सिजनची मागणी दिवसाला २ हजार मेट्रिक टन इतकी होऊ शकते. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, आम्ही देखील स्थानिक व आजूबाजूच्या ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करीत आहोत. मात्र वेळ वाचविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या ऑक्सिजनची वाहतूक इतर मार्गानी आणि त्यातही प्रामुख्याने हवाई मार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ ; व्हायरल गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
- पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा कोटा वाढवून द्या, भाजप आमदाराचे जावडेकरांना साकडे
- बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू
- विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम खेळाडू
- मला चंपा म्हणणं बंद करा, अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

