🕒 1 min read
सिंधुदुर्ग : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी भाजपला निवडणूक द्यावे असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येता कामा नाही. खुनी, भ्रष्टाचारी, वसुलीखोर, बलात्कारी आणि हिंदू विरोधी ताट मानेने राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करतायत. पंढरपूर महाराष्ट्राचं श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे ह्या बदमाशाना जागा मिळता कामा नये.’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात, तर गडकरींनाही देऊ शकतात’
- भुजबळांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांची डाळ झाली खराब, भाजप आमदाराचा आरोप
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात कडक निर्बध लागू, विनाकारण फिरण्यास मनाई
- विराटने दिलेल्या ‘त्या’ ऑफरबाबत मॅक्सवेलकडून खुलासा
- नितीन गडकरींनी बेळगावात मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये – संजय राऊत


