🕒 1 min read
बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे. त्यांना मोठ्या दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय तस तसा शेळकेंना मराठी भाषिकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मराठमोळ्या उमेदवाराला शिवसेनेनं जाहीर पाठींबा दिल्याचे घोषित केले होते. एवढच नाही तर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात येण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते बेळगावात दाखल झाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांची काल संयुक्त महाराष्ट्र चौकात सभा होणार होती. मात्र, कानडी प्रशासनाने साऊंड स्पिकर्ससह व्यासपीठाची मोडतोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. संजय राऊत हे सभा घेण्यावर ठाम होते. यानंतर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह संजय राऊत, खासदार धैर्यशील माने, शुभम शेळके, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिक यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो काढण्यात आला होता.
त्यानंतर आज संजय राऊत यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना बेळगावात प्रचारास न येण्याचे आवाहन केले आहे. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नितीन गडकरी यांचा बेळगावात प्रचारासाठी येण्यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे. गडकरी मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचेही नेते. महाराष्ट्रात सीमा भाग यावा, असे ठराव गडकरी मंत्री असतानाही झाले आहेत हे त्यांनी विसरू नये. आजही प्रत्येक विधानसभा अधिवेशनात सीमा भाग महाराष्ट्रात यावा हा ठराव करीत असतो. माझं सर्व नेत्यांना आवाहन आहे की, मराठी माणसाची एकजूट इथे आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करून नका. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

