🕒 1 min read
मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने पाठवलेल्या डाळीचे पीठ झाले असल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. ही डाळ सर्वसामान्यांना वितरीत झाली असती तर, सुमारे ७५ हजार कुटुंबियांना त्याचा लाभ झाला असता, असेही ते म्हणाले. या संदर्भात भुजबळ यांच्या धोरणामुळे हे नुकसान झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंलुंडचे आमदार असलेले कोटेचा यांनी या आधी देखील अनेकदा ही डाळ सर्वसामान्यांना वाटप करावी अशी मागणी भुजबळ यांच्याकडे केली होती. वारंवार पाठपुरावा करून देखील शासन आदेश काढण्यात आला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईत दाखल झालेली ही डाळ वितरीत होवू शकली नाही. भुजबळ यांच्या चुकीच्या धोरणामुळेच या डाळीमध्ये किड लागली असून, डाळीचे पीठ तयार झाले आहे. ही डाळ सर्वसामान्यांना लवकर वितरीत करण्यात आली असती तर, ती खराब झाली नसती, असेही कोटेचा यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/i/status/1382356063563915264
या संदर्भात कोटेचा यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हीतासाठी दिलेली डाळ, भुजबळांच्या धोरणामुळे कीडे पडुन पीठ-पीठ झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.’
धान्य वितरणाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाने आता ठाकरे सरकारला चांगलेच घेरण्याची तयारी केली आहे. लॉकडाऊन लावतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान्य मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यावरही भाजपच्या वतीने टीका करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

