🕒 1 min read
ठाणे- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या मृत्युच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.यातच आता ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
सोमय्या म्हणाले१ एप्रिल ते १३ एप्रिल २०२१ या काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. महापालिका आयुक्त यांनी खाजगी रुग्णालयातील मृतांची नोंद घेतली जात नव्हती हे मान्य केले.
कॉरोना मृतांची नोंद, ठाकरे सरकारची लपवाछपवी
1 ते 13 एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार 309 झाले असल्याची नोंद आहे pic.twitter.com/k1gbDku0So
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 15, 2021
ठाणे महापालिका क्षेत्रात १ ते ११ एप्रिल या ११ दिवसांमध्ये 57 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु, शहरातील तीन स्मशानभूमींमध्ये गेल्या 11 दिवसांमध्ये 309 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची नोंद आहे असा दावा सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट म्हणाला होता मॅक्सवेलला इडियट; मॅक्सवेलने केला खुलासा
- सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु करताच ५० कोटींचे अमली पदार्थ टाकून घुसखोर पळून गेले
- जालन्यात नाकाबंदीमध्ये पकडली पाच लाखांची अवैध देशी दारू
- ही कसली संचारबंदी…? ठिकठिकाणी पाहायला मिळतेय तुफान गर्दी
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

