पुणे – राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या सर्वांसाठीच डोकेदुखीचा विषय बनत चालली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या उपाययोजना करत असताना जनतेला जास्त त्रास होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. मात्र जनतेकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संचारबंदीची घोषणा केली आहे. मात्र पुण्यातच नव्हे तर राज्यात बहुतांश ठिकाणी लोकांनी आजही नेहमीप्रमाणे गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. किराणा मालाची दुकाने, रस्त्यावर, भाजीपाला खरेदीसाठी,सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघोली,हडपसरसह शहरातील विविध भागात गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल 7887 नवीन रुग्णांची भर पडली. कोविड-19 मुळे काल जिल्ह्यात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजारानं जिल्ह्यात दगावलेल्यांची संख्या आता 8636 झाली आहे. राज्यात काल 58952 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर कोविड-19 मुळे 278 जणांचा मृत्यु झाला. असे असून देखील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान,देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात विक्रमी 2 लाख 739 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. 93 हजार 528 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. सध्या देशभरात 14 लाख 71 हजार 877 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड 19 मुळे, गेल्या 24 तासांत 1 हजार 38 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ह्या आजारामुळे एकंदर 1 लाख 73 हजार 123 जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं – नायडू
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही


