मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेबांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
११ एप्रिल रोजी आदरणीय शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
दरम्यान,शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज (सोमवारी) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट म्हणाला होता मॅक्सवेलला इडियट; मॅक्सवेलने केला खुलासा
- सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु करताच ५० कोटींचे अमली पदार्थ टाकून घुसखोर पळून गेले
- जालन्यात नाकाबंदीमध्ये पकडली पाच लाखांची अवैध देशी दारू
- ही कसली संचारबंदी…? ठिकठिकाणी पाहायला मिळतेय तुफान गर्दी
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

