जालना: जालना शहरासह जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. बुधवारी जालना तालुक्यातील बहुतांश भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.राजूर, बदनापूर, अंबड परिसरातहील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जाफ्राबाद तालुक्यातील शिंदी उबाळेवाडी येथील शेतकरी गजानन माणीकराव मुजमुले हे आंगावर वीज कोसळून ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत गजानन मुजमुले हे आपल्या कुटुंबियासोबत शिंदी उबाळवाडी शिवारात वास्तव्य होते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जाफ्राबाद तालुक्यात ढगाळ वातावरणासह मेघगर्जना होत आहे. तर काही भागात हलक्या सरी कोसळ आहेत. आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पसिरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात रिमझिम पावसास सुरु असताना गजानन मुजमुले हे आपल्या शेतातील घरासमोरील झाडाखाली उभे होते. त्याच वेळी अचानक विज अंगावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांचा मृतदेह श्वछेदनासाठी खासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला. मुजमुले यांच्या पश्चात पाश्चात आई, पत्नी ,एक मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, तालुक्यातील बोरगांव फदाट येथे वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. दरम्यान, तालुक्यातील बोरगांव फदाट येथे वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. बोरगांव येथील उत्तम गंगाराम चव्हाण या शेतकऱ्यांचा बैल हे शेतात चरण्यासाठी सोडले असता बोरगांव परिसरात ढगाळ वातावरणासह झालेल्या पावसात कडाक्याची वीज पडल्याने बैल ठार झाला. त्यामुळे शेतकरी उत्तम चव्हाण यांचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट म्हणाला होता मॅक्सवेलला इडियट; मॅक्सवेलने केला खुलासा
- सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु करताच ५० कोटींचे अमली पदार्थ टाकून घुसखोर पळून गेले
- जालन्यात नाकाबंदीमध्ये पकडली पाच लाखांची अवैध देशी दारू
- ही कसली संचारबंदी…? ठिकठिकाणी पाहायला मिळतेय तुफान गर्दी
- एबी डिव्हीलियर्सला वाटते या गोष्टीची भिती; आरसीबीच्या मुलाखतीत केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

