Share

विराट म्हणाला होता मॅक्सवेलला इडियट; मॅक्सवेलने केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबादच्या संघाचा सलग दुसरा पराभव आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या आरसीबी संघाच्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने काही दिवसापुर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीने त्याला आणि झम्पाला ‘इडियट’ म्हणल्याचा खुलासा केला आहे. १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आयपीएल लिलावात आरसीबीने मॅक्सवेलला १४ कोटी रुपयांची बोली लावत आरसीबीच्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. त्यावेळी मॅक्सवेल हा न्युझीलंडमध्ये मालिका खेळत होता. मात्र आरसीबीने मॅक्सवेलला विकत घेण्याआधीच झम्पाने त्याची आरसीबीची कॅप मॅक्सवेलला दिली आणि तो फोटो कोहलीला पाठवला.

या फोटोवर प्रतिक्रिया देताना आरसीबीचा कर्णधार कोहली दोघाना ‘इडियट’ म्हणाला होता. या मुलाखतीचा व्हिडीओ आरसीबीने ट्विटरवर शेअर केला आहे. आरसीबीचा भाग झाल्यानंतर सालामीच्या सामन्यात मॅक्सवेलने अप्रतिम फलंदाजी करत विराट आणि आरसीबीच्या चाहत्यांचे मन जिकंले होते. या सामन्यात मॅक्सवेलने २ षटकार व ३ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!