Share

खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन ; गुलाबराव पाटलांची खास शैलीत फटकेबाजी

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपाने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामूळे एकतर्फी वाटणा-या या निवडणूकीत रंग भरले आहेत.

दरम्यान शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत जोरादार बॅटिंग केली. यावेळी पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. ३६ वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळला मत मागायची संधी मिळाली, असं ते म्हणाले. तर, खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन असं आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची जागा निवडून द्या, सरकार बदलतो, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करत फडणवीसांचा समाचार घेतला आहे. शिवसेनेने आमच्या सारख्या छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. येत्या काळात मंगळवेढा टँकरमुक्त करणार असल्याचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना मनसेने पाठिंबा दिला आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आता मनसेची साथ मिळाल्याने भगीरथ भालके यांचे पारडे अजूनच जड झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!