Share

शिवसेनेच्या ढाण्या वाघाची कानडी भूमीत डरकाळी; संजय राऊतांचा भव्य ‘रोड शो’

Published On: 

🕒 1 min read

बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कासाठी व बेळगाव-निपाणी भागाचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी स्थानिक नागरिक गेली अनेक दशके महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत लढा देत आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली असून १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

या जागेसाठी मराठी भाषिक एकवटले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शुभम शेळके या युवकाने शड्डू ठोकला आहे. त्यांना मोठ्या दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येतेय तस तसा शेळकेंना मराठी भाषिकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मराठमोळ्या उमेदवाराला शिवसेनेनं जाहीर पाठींबा दिल्याचे घोषित केले होते. एवढच नाही तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शुभम शेळकेंच्या प्रचारासाठी बेळगावात येण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते आज बेळगावात दाखल झाले आहेत.

संजय राऊत यांची संयुक्त महाराष्ट्र चौकात सभा होणार होती. मात्र, कानडी प्रशासनाने साऊंड स्पिकर्ससह व्यासपीठाची मोडतोड केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. संजय राऊत हे सभा घेण्यावर ठाम होते. यानंतर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह संजय राऊत, खासदार धैर्यशील माने, शुभम शेळके, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिक यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो काढण्यात आला होता.

यावेळी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. यावेळी, संजय राऊत हे गाडीतून वर येऊन उपस्थितांना नमस्कार करून त्यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करत होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता.

शुभम शेळकेंचा विजय निश्चित !

‘मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मी बेळगावात आलो आहे. त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यासाठी मला पाठवलं आहे. सुरुवातीला शुभम शेळके यांना ५० हजारच्या आसपास मते पडतील अशी निराशाजनक परिस्थिती होती. आता, लोकांचा प्रतिसाद बघता विजय निश्चित आहे,’ असं भाष्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!