🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय. त्यामुळे निष्काळजीपणे काम करणाऱ्या सरकार आणि सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, असं धक्कादायक विधान माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंनी केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे आरोग्य व्यवस्था नाही, तुम्ही फक्त लसींचा पाठलाग करताय, राज्यकर्त्यांना लोकांचे काही देणे-घेणे नाही, लोक मेले तरी चालतील, हा जाणूनबुजून केलेला गुन्हा आहे, त्यामुळे यांच्यावर मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी यावेळी निलेश राणेंनी केली आहे.
जेव्हा आँर्गनाईझ क्राईम होते तेव्हा मोक्का कायदा लावला जातो. हे आँर्गनाईझ क्राईम नाही का, लोकांना ठरवून मारलं जातंय, हकनाक लोकं मरतायत याला जबाबदार कोण, असा उद्विग्न सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊनवरून निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केलाय. लॉकडाऊन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला भिकेला लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवडीचा विषय म्हणजे लॉकडाऊन, ते बेरोजगारीवर काही बोलत नाहीत, व्यापारी रस्त्यावर आहेत. रिक्षा, बस, टॅक्सी चालू आहेत, पण गार्डन बंद, ऑफिसेस बंद, दुकानं बंद आहेत. मग लोकं जाणार कुठे?, असाही प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय; केंद्राने पत्र लिहून राज्य सरकारला फटकारलं
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल


