🕒 1 min read
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
देशातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच, दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत असल्याने स्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे आता योग्य उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं आहे.
महाराष्ट्रासोबतच छत्तीसगड आणि पंजाबला देखील त्यांनी पत्र लिहिलं आहे. या राज्यांमधील जिल्ह्यांमध्ये तैनात केंद्रीय पथकांच्या मूल्यांकनाच्या आधारावर हे पत्र लिहिण्यात आले आहे. केंद्र सरकारने या पत्रात टेस्टींग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टींग, कंटेन्मेंट मोहीम, हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारच्या त्रुटींसंबंधी केंद्राने हे पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथकं आहेत. ही पथकं आपल्या कार्याचा रोजचा अहवाल मंत्रालयाने नियुक्ती केलेल्या नोडल अधिकाऱ्याला पाठवत असतात. यावरूनच प्रदूरभाव रोहण्यासाठीच्या त्रुटी दूर करून योग्य उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना देखील या पत्राद्वारे दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांचे शरद पवारांच्या पावलावर पाऊल,भगीरथ भालकेंसाठी घेतली भरपावसात सभा
- लॉकडाऊन कधी होणार ? टास्क फोर्सनंतर आता मुख्यमंत्र्यांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
- पुण्यातून बिहारला गेलेल्या प्रवाशांना अर्धा तास रेल्वेतच कोंडले, १७ प्रवासी पॉझिटिव्ह
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

