Share

जयंत पाटलांचे शरद पवारांच्या पावलावर पाऊल,भगीरथ भालकेंसाठी घेतली भरपावसात सभा

Published On: 

🕒 1 min read

मंगळवेढा – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. यावेळी सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. यावेळी जयंत पाटील यांनी भर पावसात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला.

पाटील म्हणाले, मी जलसंपदा मंत्री झालो व आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला.इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतलं असं कळलं पण कधी इथे फिरकले नाही. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे.

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल! असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. १८ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते.त्यावेळी जोरदार वारे वाहत पावसाचे आगमन झाले.यानंतर देखील शरद पवारांनी माईक हाती घेतला आणि भर पावसात भाषण केले होते या सभेची आठवण आजच्या सभेने अनेकांना आली असणार हे नक्की.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!