Share

पुण्यात रेमडेसीवीरचा तुटवडा; पुण्याच्या महापौरांनी जाहीर केले ‘हे’ मदत क्रमांक

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील स्थिती पाहता आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील रुग्णांना आता वेळेत व योग्य दरात रेमडेसीवीर इंजेक्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात या इंजेक्शन साठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत असतानाच गुजरातमध्ये मात्र या इंजेक्शनचं मोफत वाटप सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच आरोग्य सुविधांचा तुटवडा आहे का ? असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, कोरोनाची स्थिती बिकट असलेल्या पुणे शहरातील रेमडेसीवीर इंजेक्शन बाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मदत क्रमांक जाहीर केले आहेत. ‘रेमडेसीवीर इंजेक्शन वितरणासाठी आता नियंत्रण कक्ष ! रेमडिसिवीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे, यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून सदरील इंजेक्शन हवे असल्यास 020-26123371 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.’ असं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!