🕒 1 min read
नवी दिल्ली- देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे.या पार्श्वभूमीवररुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशातच आता केंद्र सरकारने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Export of injection Remdesivir and Remdesivir Active Pharmaceutical Ingredients (API) prohibited till the COVID19 situation in the country improves: Government of India pic.twitter.com/KLENjzTNyn
— ANI (@ANI) April 11, 2021
देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचा पार्श्वभूमीवर भारत सरकारने हे इंजेक्शन व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन व ते बनवण्यासाठी लागणारी सामग्री देशाबाहेर निर्यात करता येणार नाहीये. हा निर्णय देशातील करोना परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत लागू असेल. यामुळे करोना विषाणूच्या गंभीर रुग्णांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंबे खाऊन मुलगा होतो अशी विधाने करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाबाबत अफवा पसरवू नये’
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- ‘केंद्र सरकार, मोदी, फडणवीस यांच्यावर बोलण्यात वेळ घालवू नका,राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारा’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

