🕒 1 min read
औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील संघटना ‘क्रेडाई’च्या औरंगाबाद शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच झाली. यात अध्यक्षपदी आर्किटेक्ट नितीन बगडिया, सचिव म्हणून अखिल खन्ना तर खजिनदार म्हणून अनिल आग्रहारकर यांची निवड करण्यात आली. याच वेळी कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली असून, नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. १३ रोजी सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यकारिणीची कार्यकाळ पुढील दोन वर्षांसाठी म्हणजे २०२१-२२ आणि २०२२-२३ असा असेल.
क्रेडाई (कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे बांधकाम व्यवसाय आणि व्यावसायिक यांच्या विविध समस्या, प्रश्नांची सोडवणूक, शासन आणि प्रशासनाशी संपर्क आणि संवाद, विविध नियम आणि नियमावलीबाबत जागरूकता, प्रशिक्षण आदी अनेक प्रश्नांवर सातत्याने काम केले जात. याच बरोबर समाजातील एक महत्वाचा घटक या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमही संघटनेतर्फे सातत्याने राबविले जातात.
देशाच्या प्रगतीत खूप मोठा हिस्सा उचलणाऱ्या बांधकाम व्यवसायासमोर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अनेक समस्या उभ्या राहत आलेल्या आहेत. त्यावर मात करीत संघटना आपले सदस्य तसेच ग्राहक आणि समाजहितासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेऊन त्याची अंमलबजावणीही करीत असते.
नरेंद्रसिंग जबिंदा, सुनिल बेदमुथा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीची मुदत संपल्याने यंदा नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी एक अभ्यासू, धडाडीचे आणि स्पष्टवक्ते, उत्तम सामाजिक भान असलेले तरुण बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट नितीन बगडिया यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला सचिवपदी तितकेच धडाडीचे अखिल खन्ना सचिवपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या पदग्रहण समारंभात माजी पदाधिकारी नूतन कार्यकारिणीकडे औपचारिकरीत्या पदभार सोपवतील या प्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष (इलेक्ट) प्रमोद खैरनार, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष रवी वट्टमवार, ज्येष्ठ सदस्य पापलाल गोयल, सुनील पाटील, देवानंद कोटगिरे, प्रकाश मालखरे , जुगल तापडीया , संजय कासलीवाल आदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
नूतन कार्यकारिणी अशी
अध्यक्ष – आर्कि. नितीन बगडिया,
उपाध्यक्ष – विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, अनिल मुनोत, आशुतोष नावंदर, सुनील बेदमुथा, इंद्रजीत थोरात.
सचिव – अखिल खन्ना, सहसचिव – सुनील राका, अजित बापट, रोहित सूर्यवंशी
कोषाध्यक्ष – अनिल अग्रहारकर, सहकोषाध्यक्ष – बालाजी येरावार
पीआरओ – सुशील धूत
सहसमन्वयक – पंजाब तौर, अखिल भालेकर
संचालक – मनोज रुणवाल, गोपेश यादव, विनोद अग्रवाल, प्रशांत अमिलकंठवार, समीर मालखरे, भावेन सुखिया, नीलकंठ नागपाल
युथ विंग समन्वयक – सौरभ गुप्ता
वूमेन विंग समन्वयक – श्वेता भारतीया.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, त्यांना लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही’
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- ‘बीडच्या भाजप खासदार डॉ.प्रितम मुंडे हरवल्या आहेत!’
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

