Share

भाजपकडून मोफत वाटप होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही – रूपानी

Published On: 

अहमदाबाद – देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजप कार्यालयातून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे.

या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात प्रदेश भाजपने ५००० रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले होते. भाजपकडून हे रेमडेसिवीर इंजेक्शन सुरतमध्ये मोफत दिले जात आहेत. पण भाजपकडून मोफत वाटप होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही असे त्यांनी म्हटले आहे.

मोफत वाटप होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा भाजपने मागवलेला आहे. हे रेमडेसिवीर इंजेक्शन्स सुरतमध्ये वाटले जात आहे. हा पक्षाचा विषय आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी हा त्यासाठी वेगळी ऑर्डर दिलेली आहे. राज्य सरकारशी याचा कुठलाही संबंध नाही, असं विजय रुपानी यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!