मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांच्या २ स्वीय सहाय्यकांना समन्स बजावले आहे. २ स्वीय सहाय्यकांचे जबाब सीबीआय नोंदवणार आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. हायकोर्टाच्या निर्देशावरून या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.
दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आणि सर्वोच्च, उच्च न्यायालयात राज्य शासनास प्रतिवादी करणे ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची कृ ती अखिल भारतीय सेवा(वर्तणूक) नियमांचा भंग आहे का, याबाबत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश गृहविभागाने पोलीस महासंचालकांना जारी के ले आहेत.
ही चौकशी नवनियुक्त महासंचालक संजय पांडे करणार आहेत. आवश्यक त्या अधिकाऱ्यांची चौकशी करणे, त्यासाठी नोटीस जारी करणे आणि त्यांचे जबाब नोंदवण्याचे अधिकार गृहविभागाने पांडे यांना प्रदान केल्याचे गृहविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील’
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर फडणवीस काय करणार ?, राऊतांचा टोला
- ही’ कार बुक करण्यासाठी एसबीआय देत आहे बंपर ऑफर
- ‘रेमडेसिवीर भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय; हे राजकारण नाही तर काय सुरू आहे’


