🕒 1 min read
चेन्नई : सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला सलामीच्या लढतीत पुन्हा एकदा पराभूत व्हावे लागले.कालपासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आयपीएलची टशन यंदा भारतात रंगली. कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्समध्ये झाला. सालाबाद प्रमाणे यावेळीही मुंबई सलामीचा सामना हरला. सलामीच्या सामन्यात दोन विकेट्स राखून विजय नोंदवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर संघाच्या पराभवामागचे नेमके कारण सांगितले आहे.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘माझा विश्वास आहे की पहिले सामना जिंकण्यापेक्षा विजेतेपद जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे. मला वाटते की हा एक चांगला प्रयत्न होता. आम्ही शेवटपर्यंत संघर्ष केला. आम्ही चांगली सुरुवात केली, पण शेवटी आम्हाला 20 धावा कमी पडल्या. पहिल्या सामन्यात काही चुका आहेत. पण आता आम्हाला पुढे जावे लागेल. बंगळुरूविरुद्धची लढत चांगली झाली.
‘अखेरच्या चार षटकांमध्ये एबी डिव्हिलियर्सला बाद करण्याची आमची योजना होती. त्यासाठीच आम्ही बुमराह आणि बोल्टकडून गोलंदाजी करवून घेत होतो. मात्र आमची ही रणनीती यशस्वी ठरली नाही आणि डिव्हिलियर्सने हा सामना आरसीबीकडे झुकवला, असे रोहित शर्मा म्हणाला.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहली (33) आणि ग्लेन मॅक्सवेल (39) धावा केल्या. ही दोघे माघारी परतल्यानंतर मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकली होती. मात्र एबीने 27 चेंडूत केलेल्या 48 धावांच्या जोरावर अखेर बंगळुरुला यश मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान; ३७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
- पंत आणि धोनी आमने-सामने ; आज रंगणार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना
- कोरोना कहर! लातूर जिल्ह्यात १४०४ विक्रमी रूग्णसंख्या
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- चिंताजनक! लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

