Share

उस्मानाबाद: उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्याने उपचार बंद, सामान्य रुग्णांची हाेतेय गैरसाेय

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: तालुक्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालयास आता कोरोना रुग्णालय केल्यामुळे कोरोनाच्या आजारा व्यतिरिक्त अन्य आजाराची तपासणी, उपचार करण्यात येत नाहीत. सद्यस्थितीत २७१ पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात असल्याने सामान्य रुग्ण सेवा शुक्रवार पासून बंद केली आहे.

गत वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात केवळ कोविड रुग्ण सेवा सुरू करण्यात आल्यामुळे अन्य आजारासाठी तालुक्यात खासगी रुग्णालयाचे अधिगृहीत केल्याने सामान्य आजारांंवर उपचारास सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण अन् नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदाच्या वर्षातही कोरोना पॉझिटिव्ह संख्या वाढत असल्याने उपजिल्हा रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यात गेल्या दोन महिन्यात सर्वाधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एप्रिलच्या महिन्यात सद्यस्थितीत २७१ जण उपचारात असल्यामुळे प्रशासनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयास कोरोना रुग्णालय केले आहे. उपजिल्हा रुग्णालय कोरोना रुग्णालय झाल्याने अन्य सुविधा, उपचार सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!