🕒 1 min read
मुंबई : सरकारी नोकरी मिळवण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र अनेक कारणांमुळे ही संधी तरुणांच्या हातून निघून जाते मात्र आता शासकीय बँकेत सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या ही आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिपार्टमेंटमध्ये मॅनेजरच्या ५११ जागांवर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
यामध्ये जाहिरातीनुसार, ज्येष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रॉडक्ट (इन्व्हेस्टमेंट एंड रिसर्च), हेड (ऑपरेशन्स अँड टेक्नॉलॉजी), डिजिटल सेल्स मॅनेजर आणि आयटी फंक्शनल अॅनालिस्ट-मॅनेजर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर bankofbaroda.in ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आज ९ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. यासाठी बँक ऑफ बडोदाने केलेली ६०० रुपये अर्ज फी निश्चित केली आहे. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना केवळ १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
विविध पदांनुसार रिक्त पदांची संख्या..
वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक – ४०७ पोस्ट
ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर -५० पोस्ट
टेरिटरी हेड – ४४ पोस्ट
गट प्रमुख – ०६ पोस्ट
उत्पादन प्रमुख (गुंतवणूक आणि संशोधन) – १ पोस्ट
प्रमुख (ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञान) – १ पोस्ट
डिजिटल सेल्स मॅनेजर – १ पोस्ट
आयटी कार्यात्मक विश्लेषक-व्यवस्थापक – १ पोस्ट
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही – निवडणूक आयोग
- लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर
- हा कोरोनाचा नवा विषाणू आहे त्याला थांबवायचे असेल तर कडक निर्बंध आवश्यकच – उद्धव ठाकरे
- विनामास्क सामना पाहत बसलेल्या जय शाह यांच्यावर नेटीझंन्स भडकले, कारवाईची होतेय मागणी
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

