Share

आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

मालवण – उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजप गटनेते गणेश कुशे यांच्या उपोषणस्थळी दंगल नियंत्रण पथक कार्यान्वित करून तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या पोलीस प्रशासनाला भाजप नेते निलेश राणेंनी फटकारले आहे. याठिकाणी पोलिसानी छावणी निर्माण केली आहे. आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय. हे नगरसेवक आहेत, असं निलेश राणे यांनी पोलीस निरीक्षक मुल्ला यांना सुनावलं.

मालवण नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारा विरोधात उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजपा गटनेते गणेश कुशे यांनी सोमवारपासून आमरण उपोषण छेडले होते. या उपोषण स्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवताना जिल्हा विशेष शाखेची पोलीस कुमक आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केल्याने मालवण नगरपालिका आवारात तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. माजी खासदार निलेश राणे यांच्या गुरुवारच्या दौऱ्यावेळी हा वाढीव पोलीस बंदोबस्त पाहून या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक मुल्ला यांना निलेश राणे यांनी फटकारले.

एवढा वाढीव बंदोबस्त कशासाठी ? आम्हाला संघर्ष करायला लावू नका. आम्ही आतंकवादी नाही. याठिकाणी उपोषणास बसलेले नगरसेवक आहेत. त्यांचा हक्क मागण्यासाठी ते याठिकाणी आले आहेत. पोलिसांनी देखील पालिका प्रशासनाला योग्य ती समज द्यावी. १५ दिवसांत आम्ही केलेल्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे. नाहीतर आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. मग खुशाल आमच्यावर केसेस टाका, लाठ्या काठ्या मारा, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!