Share

‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनानं निधन झालं आहे. ते ५५ वर्षांचे होते. करोनाचं निदान झाल्यानंतर अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा सदस्य रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला, अशा शोकभावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. त्यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क होता. कार्यकर्त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून जात असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. शुक्रवारी आपण रूग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

आजारपणावर मात करून ते पुन्हा लोकसेवेला सुरुवात करतील अशी अपेक्षा होती पण शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस परिवार एका निष्ठावान कार्यकर्त्याला मुकला आहे.रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतापूरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!