पंढरपूर : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली आहे.यातूनच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्यात पाच एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दिवसा जमावबंदीचा आदेश जारी झाला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू राहणार आहेत. याशिवाय शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात टीका केली आहे. लॉकडाऊन हे राजकीय अस्त्र म्हणून वापरले जात आहे. 100 कोटींचे झालेले आरोप, वीज तोडणीवरून असलेली नाराजी आणि तीन पक्षातील वाद यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
जनतेने 100 टक्के लॉकडाऊन पाळल्यावर एकाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री मुख्यमंत्र्यांनी, द्यावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.पंढरपूर पोटनिवडणुकीत वंचितचे उमेदवार बिराप्पा मधुकर मोटे यांच्या प्रचारासाठी आले असता प्रकाश आंबेडकर बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
