🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.
अखेर, अनिल देशमुख हे राजीनामा देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘देशमुख आपला राजीनामा सोपवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमल्यामुळे राजीनामा देण्याची तयारी स्वतः अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे दर्शवली होती. शरद पवार यांनी देखील राजीनाम्याला होकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील हा राजीनामा मंजूर करतील,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर आता विरोधी पक्षातील विविध नेत्यांची प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय,ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ?’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय..
ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ?
मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??— Nitesh Rane (@NiteshNRane) April 5, 2021
अनिल देशमुखांनी नैतिकता दाखवत राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया सध्या सरकारमधील अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी हे ट्वीट करून टीकास्त्र डागलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ
- ‘देशमुखांच्या निवासस्थान आणि कार्यालयात पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
