कोलकाता : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
यामध्ये पश्चिम बंगाल मध्लो निवडणूक मोठी प्रतिक्षेची बनली आहे. कारण येथे ममता आणि मोदी यांच्यात वेळोवेळी थेट विरोध होत असल्याचा आणि प्रचार मोहिमांचा रोख देखील असाच राहिल्याचे दिसून आले यामध्ये मिठाई साठी प्रसिद्ध असलेल्या बंगाल मध्ये मिठाईच्या माध्यमातून देखील प्रचार झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी हावडा येथील मिठाईच्या दुकानात विधानसभा निवडणुकीचे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. या दुकानात तीन आघाडीच्या नेत्यांचे मिठाईचे पुतळे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह संयुक्त मोर्चाच्या तीन नेत्यांच्या समावेश आहे . तर हे पुतळे पुतळे मेणाचे नाहीत मिठाईत बनवण्यात आले आहेत.
या आधी देखील प्रसिद्ध बलराम मल्लिक मिठाईवाल्यांनी दुकानात मोदी आणि ममता यांच्या प्रतिमा असलेल्या मिठाई त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे असलेल्या मिठाई बनवली होती.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा थैमान, घाटीत आणखी अठरा रुग्णांचा मृत्यू
- ‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
- विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर
- ‘जान है तो जहान है’ असं म्हणत जीम मालकांचा लॉकडाऊनला पाठींबा
- ‘जान है तो जहान है’ असं म्हणत जीम मालकांचा लॉकडाऊनला पाठींबा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
