Share

‘निवडणूक आयोग’, ईव्हीएम मशीन प्रकरणावर राहुल गांधींचे दोन शब्दांत ट्विट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, आसाम आणि प. बंगाल मध्ये दोन टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काही गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असं मध्ये एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले होते. महत्त्वाचे म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली होती.

यावरून कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजप वर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान या प्रकरणातील ईव्हीएम मशीन सापडलेल्या भाजप उमेदवारावर प्रचार करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांनतर हि बंदी 48 तासांऐवजी 24 तास करण्यात आली आहे. यावरून प्रियंका यांच्यासह राहुल यांनी देखील टीका केली आहे.

त्यांनतर आता पुन्हा केवळ ‘निवडणूक आयोग’ या दोन शब्दात ट्वीट करत यावेळी त्यांनी सूचक ट्वीट केले आहे. या आधी त्यांनी ‘निवडणूक आयोगाची गाड़ी ख़राब, भाजपाची नीयत ख़राब, लोकशाहीची हालत ख़राब’ असे ट्विट केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!