Share

दिल्ली कॅपिटल्सनंतर आता धोनीच्या चेन्नई संघावर कोरोनाच सावट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.

आयपीएल 2021 सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत.दरम्यान,आयपीएल सुरु होण्याआधी दिल्ली कॅपिटल्ससह चेन्नई संघाला  मोठा धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टाफ मेंबर हे कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर अक्षर पटेल 28 मार्च रोजी संघात सामील झाला होता. परंतु, दुसऱ्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.

अक्षर पटेलचा दुसरा कोरोना अहवाल सकारात्मक आढळल्यानंतर सध्याच्या घडीला त्याला वैद्यकीय देखरेखीखाली क्वारंटाईन करण्यात आल्याचे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्स संघातील एका स्टाफ मेंबरचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला असल्याचे समजते. स्टाफ मधील या मेंबरला देखील क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती चेन्नई सुपर किंग्स संघाने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!