🕒 1 min read
पुणे : झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुण्यात लॉकडाउन लागू करायचा की नाही, याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध केला. तर प्रशासनाने देखील लॉकडाऊन नको पण निर्बंध अधिक कडक करावेत अशी भूमिका या बैठकीत घेतली.
उद्यापासून (३ एप्रिल ) पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे.
तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर ९ एप्रिलला पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली.
या मिनी लॉकडाऊनमध्ये सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाला आता पुण्यातील हॉटेल व्यवसायिक संघटनेने तीव्र असा विरोध केला आहे. ‘हा आमच्यासाठी काळा दिवस आहे’ अशा शब्दांत त्यांनी त्यांचा विरोध दर्शवला आहे.
तर या निर्बंधाना पुणे भाजपने कडाडून विरोध केला आहे. पुण्याची जीवनवाहिनी असणारी पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. परंतु हा निर्णय अतिशय चुकीचा आहे असे मत भाजपने व्यक्त केले आहे. पुण्याची जीवनवाहिनी असणारी पीएमपीएमएल किमान ४०% टक्के क्षमतेने चालू ठेवण्यात यावे असे मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.
तसेच पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु हि संचारबंदी ६ एवेजी ८ वाजल्यापासून करण्यात यावी. या दरम्यान पोलिसांनी कोणालाही अमानुष मारहाण करू नये. कायदेशीर रित्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन करायला मुख्यमंत्रीच उतावीळ झालेत; नारायण राणेंचा हल्लाबोल
- राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! नाना पटोलेंची केंद्राकडे मागणी
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार ; अमित शहांची भविष्यवाणी
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
