Share

मुंबईच्या लोकल सेवेबाबत विजय वडेट्टीवार यांनी केलं महत्वाचं भाष्य !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तर, राजधानी मुंबईत देखील कोरोना रुग्णांमध्ये मोठी भर पडत असल्याने मुंबईबाबत देखील कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. तर, सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेसाठी सुरु करण्यात आलेली लोकल पुन्हा एकदा बंद केली जाईल का ? याकडे सामान्य नोकरदारवर्गाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘राज्यात दररोज ३५ ते ४० हजार रुग्ण वाढत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही,’ असं सांगतानाच त्यांनी मुंबई लोकलबाबत विचारलेल्या प्रश्नावर देखील उत्तर दिलं आहे. ‘मुंबई लोकल बंद होणार नाही,’ असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!