मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा दमदार खेळाडू म्हणजेच रिषभ पंतने मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आला आहे. रिषभचे सामन्या दरम्यानचे स्टम्पच्या पाठीमागून बोलतानाचे तसेच गाणी म्हणण्याचे बरेच व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्या या बोलक्या स्वभावामुळे रिषभ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता रिषभ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. आता खुद्द उर्वशीनेच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीच्या एका फॅन्सने तिला इन्स्टाग्रामवर तुझा आवडता क्रिकेटर्स कोण आहे?, असा प्रश्न विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं, मी क्रिकेट अजिबात बघत नाही. त्यामुळे मी क्रिकेटर्सला फारसं ओळखत नाही. असं सांगताना मात्र तिने सचिन सर आणि विराट सर यांचा मी खूप आदर करते. असही सांगितलं.
रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही फॅन्सनी पाहिलं होतं. त्यावेळी या दोघांच्या रिलेशनची चर्चा झाली होती. मात्र, यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, रिषभने कानाला खडा लावत उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. सध्या रिषभ इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दबावामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू’ द्रमुकच्या नेत्याचे गंभीर आरोप
- शाहरुखला आयपीएलआधी मोठा दिलासा ; ‘हा’ खेळाडू कॅम्पमध्ये होऊ शकतो सहभागी
- ‘उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा ?’
- आयपीएल न खेळता ‘या’ खेळाडूला मिळणार 7 कोटी रुपये
- कॅन्सरशी लढला पण वर्ल्ड कप नाही सोडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

