🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत
या पार्श्वभूमीवर पंधप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मोर्चा तामिळनाडू कडे वळवला आहे. आज ते तामिळनाडूमध्ये ४ निवडणूक प्रचार रॅलीमध्ये मतदारांना संबोधित करणार आहे. तर याचबरोबर केरळमध्ये देखील ते प्रचार मोहिमेत सामील होतील यावेळी तमिळनाडूत दाखल झाल्यानंतर त्यांनी पारंपारिक वेशभूषेत मदुराईच्या मिनाक्षी देवीची पूजा-आर्चना केली आणि दर्शन घेतले. याबद्दल पंतप्रधान मोदींच्या ट्वीटर वरून देखील सांगण्यात आले आहे.
Prayed at the Madurai Meenakshi Amman Temple. pic.twitter.com/ZUDRIZavDH
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2021
त्यानंतर आज मोदींची प्रचार सभा पार पडेल यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.के पलानीस्वामींसह इतर नेते मंडळी यांची उपस्थिती असेल यावेळी संध्याकाळी ४ वाजता कन्याकुमारी येथे तर संध्याकाळी ६ वाजता तिरूअनंतपुरममध्ये देखील एका जनसभेला मोदी संबोधित करणार आहेत. तामिळनाडू आणि केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार आता या हिंदी मालिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
