Share

नाथषष्ठी निमित्ताने पैठण मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची होणार कोरोना तपासणी

Published On: 

🕒 1 min read

पैठण : नाथषष्ठी निमित्ताने भाविक व वारकऱ्यांची गर्दी होऊ शकते त्यामुळे पैठण प्रशासनाच्या वतीने शहरात येणाऱ्यांसाठी कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. ज्यांना लक्षणे असतील अँटिजेन चाचणी करण्यात येईल असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले. नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरीही दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पैठण शहरात दाखल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पैठण शहरात येणाऱ्या पैठण-शेवगाव रोडवर गोलनाका परिसर, पैठण-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल सह्याद्रीजवळ व शहरातील गागाभट्ट चौकात असे तीन कोरोना तपासणी केंद्र नगर परिषदेच्यावतीने कोरोना तपासणी केंद्र उभारण्यात आले आहेत.

या ठिकाणी पैठण शहरात येणाऱ्या भाविकांची व वारकऱ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासून शरीरातील ऑक्सिजन लेव्हल सुध्दा घेण्यात येणार आहे. यात लक्षणे आढळून आलेल्या भाविकांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. गुरुवारी नाथमंदीर परिसर, गोदाकाठातील निर्याण दिंडी मार्ग, गागाभट्ट परिसर, पालखी ओटा, व आतील नाथ मंदीर परिसराची स्वच्छता नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड, व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत आज पोलीस दलाचे शहरातून संचलन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!