Share

या खेळाडुंने तब्बल ६ वेळा स्विकारला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभव

Published On: 

मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सलामीचा सामना चेन्नई येथे आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या संघादरम्यान होणार आहे. सर्व संघ आयपीएलची ट्रॉफी उचलण्यासाठी आतुर आहेत. मात्र एक खेळाडू असा आहे ज्याने तब्बल सहा वेळा आयपीएलच्या अंतीम सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. हा खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत तब्बल ९ वेळा अंतिम सामना खेळला आहे. यातील चेन्नईकडून आठ वेळा तर रायझिंग पुणे या संघाकडून १ वेळा अंतीम सामना खेळला आहे. यातील चेन्नईकडून झालेल्या पाच अंतिम सामन्यात तर एकदा पुणे संघाकडून धोनीला अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. २०१६ आणी २०१७ या दोन सत्रात चेन्नई आणि राजस्थानच्या संघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

त्यामुळे २०१६ आणि २०१७ या वर्षात रायझिंग पुणे सुपरजायंटस् आणि गुजरात लॉयन्स या संघाचा समावेश आयपीएल स्पर्धेत करण्यात आला होता. २०१६ साली झालेल्या आयपीएल सत्रात धोनी पुणे संघाचा कर्णधार होता. तर २०१७ च्या आयपीएल सत्रात स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्यात आल्यामुळे धोनी केवळ एक खेळाडू म्हणून ती स्पर्धा खेळला होता. याच हंगामात पुण्याच्या संघाला अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले होते. तर चेन्नई कडुन २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!