मुंबई – तुम्ही नवी मुंबईतील भतीजाच्या एका ३०० कोटीच्या जमीन व्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली त्यावेळी ती चांगली होती आणि आता आमच्या सरकारने गठीत केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या एक सदस्यीय समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे योग्य नाही. फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या टिकेला उत्तर दिले आहे.
परमवीरसिंग यांनी केलेल्या आरोपावर सरकारने एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली असून तिला अधिकार नसल्याची टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या टिकेचा समाचार नवाब मलिक यांनी घेतला आहे. एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीशांची ही समिती सहा महिन्यात आरोपांची चौकशी करुन अहवाल सरकारला सादर करेल असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला नवाब मलिक यांनी नवीमुंबईतील भतीजा जमीन व्यवहारात अशीच एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी केली होती. स्वतः समिती गठीत केली त्यावेळी ती ठिक आणि आमच्या सरकारने गठीत केली तर ती अधिकार नसलेली ही दुतोंडी भाषा योग्य नाही. चौकशी झाल्यावर काय सत्य आहे ते बाहेर येईलच याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य, पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर
- ‘लोकांनी बेदरकारपणा थांबवला नाही तर कडक पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही’
- ना तुम जानो ना हम… दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं
- शाब्बास लातूरकर! ९८ हजार जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

