Share

कोरोना प्रतिबंधासाठी दररोज १० हजार चाचण्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी महापालिका आता रोजच्या दहा हजार कोरोना चाचण्या करणार आहे. यासाठी शंभर पथके तयार केली जाणार आहे. एका अ‍ॅन्टिजेन चाचणीसाठी ५७ रुपये तर एका आरटीपीसीआर चाचणीसाठी १४ रुपये खर्च येतो. हा खर्च पालिका शासकीय निधीतून भागवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाची साखळी वाढत असताना जुलै २०२० मध्ये प्रशासनाने नऊ दिवसांचा लॉकडाऊन घेतला होता. या काळात पालिकेने कोरोना मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या होत्या. परिणामी, त्यानंतर कोरोना संसर्गाच्या साखळीला काही प्रमाणात ब्रेक लागला होता.

आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवणे हाच पर्याय असल्याचे मानले जात आहे. शासनाकडून देखील कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेने आता आगामी काही दिवस रोज दहा हजार कोरोना चाचण्या करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात या चाचण्या केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी शंभर पथके तयार केली जाणार आहेत. सध्या १८०० ते २००० अ‍ॅन्टिजेन चाचण्या तर १३०० ते १५०० आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.

रोजचा तीन लाखांचा खर्च

प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी याबाबत सांगितले की, कोरोनाच्या एका अ‍ॅन्टिजेन चाचणीसाठी ५७ रुपये तर एका आरटीपीसीआर चाचणीसाठी १४ रुपये खर्च येतो. या खर्चाचा विचारात घेता रोज दहा हजार चाचण्या केल्यास किमान तीन लाख रुपयांचे खर्च येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!